# स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

* मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकवून बाईक रॅलीचा शुभारंभ * तिरंगा बाईक रॅलीमध्ये वरिष्ठ अधिका-यांचे सारथ्य- 300 हून अधिक पोलीस अधिकारी / अंमलदारांचा सहभाग * पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण * स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रमप्रसंगी प्रशस्तिपत्र प्रदान * नवजीवन वसाहत येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण * आत्मसमर्पित जहाल माओवादी डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच आपल्या स्व-गावी जाऊन केला स्वातंत्र्य दिन साजरा

Amazon.in/ONLINE SHOPPING

गडचिरोली विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक-15/08/2025

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून संपूर्ण भारत देशात आजचा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांचे स्मरणही आजच्या दिवशी केले जाते. आज दिनांक 15/08/2025 रोजी 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलातील 07 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पदक विजेत्यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यासोबतच काल दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहिद कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर नवजीवन वसाहत येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करत ध्वजारोहण करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटंुबामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.

यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे मा. राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्री. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा फडकवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. सदर रॅलीसाठी गडचिरोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिका­यांसह एकूण 300 हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालय, गडचिरोली ते इंदीरा गांधी चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचे आयोजन देशसेवा तसेच शौर्य आणि त्यागाचा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. सदर रॅलीचे शुभारंभप्रसंगी, मा. खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ डॉ. श्री. नामदेव किरसान, माजी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ श्री. अशोक नेते, मा. आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ श्री. मिलींद नरोटे, मा. जिल्हाधिकारी गडचिरोली श्री. अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी गडचिरोली श्री. रणजित यादव व सहा. पोलीस अधीक्षक, धानोरा श्री. अनिकेत हिरडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते.


यासोबतत मागील वर्षी माहे जून 2024 मध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. आजच्या या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गिरीधर तुमरेटी याने आत्मसमर्पणानंतर पहिल्यांदाच त्याच्या मूळ गावी मौजा जवेली ख्ुर्द येथे भेट देत ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करुन संविधानाप्रती आदर व्यक्त केला.

माओवादी अतिदुर्गम गावंामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र गडचिरोली पोलीस दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावत आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुर्गम-अतिदुर्गम भागंामध्ये व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोलीस मदत केंद्र येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला. विशेष बाब म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांनी पोलीस पथकासह अभियान राबवून पोस्टे नारगुंडा हद्दीतील अतिदुर्गम मर्दहूर येथे ध्वजारोहण करत नागरिकांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा केला. तसेच पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शालेय विद्याथ्र्यांची रॅली तसेच अंमली पदार्थ विरोधी शपथ याप्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. तसेच अतिदुर्गम भागांमध्ये विद्यार्थी आणि गावक­यांच्या सहभागाने राष्ट्रध्वजासोबत मिरवणूका काढण्यात आल्या. यासोबतच नव्याने उभारलेल्या पोस्टें नेलगुंडा व पोस्टे कवंडे याठिकाणी देखील पहिल्यांदाच राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला.

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker