# गडचिरोलीचे पत्रकार व्यंकटेश दुडमवार यांना व्हॉईस ऑफ मिडियाचे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

गडचिरोलीचे पत्रकार व्यंकटेश दुडमवार यांना व्हॉईस ऑफ मिडियाचे उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित*

*राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे सत्कार*.

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :-19/11/2025

व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांना व्हॉईस ऑफ मिडिया जगातील क्रमांक एक असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात राज्य शिखर अधिवेशन १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात पार पडले त्यावेळी त्यांना हा पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते देण्यात आला.

      व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार हे गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यात संघटनेच्या शाखा निर्माण करून ३०० च्या वरून सदस्य संख्यांची भर घातली आहे. पंढरपूर येथील राज्य शिखर अधिवेशनाला त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ७५ पत्रकारांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील पत्रकारांना राहण्याची सोय करण्यासाठी येत्या वर्षभरात गडचिरोली येथे पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.

व्यंकटेश दुड्डमवार जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्य प्रवक्ता महेश तिवारी, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय तिपाले, राज्य कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, विदर्भ सरचिटणीस सुमित पाकलवार, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे, महिला विंगच्या जिल्हाध्यक्षा रोशनी बैस, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत उपाध्ये, चामोर्शी तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर, सचिव विनोद खोबे, अहेरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड, भामरागड तालुकाध्यलश लीलाधर कसारे, आरमोरी तालुकाध्यक्ष ऋषीं सहारे, धानोरा तालुकाध्यक्ष शरीफ कुरेशी, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजरतन मेश्राम, कुरखेडा तालुकाध्यक्ष विजय भैसारे, एटापल्ली तालुकाध्यक्ष रवी रामगुंडेवार तसेच जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. #Voice of Media #Gadchiroli #District #President Venkatesh

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!