# पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सिरोंचात भव्य रक्तदान शिबिर; पोलीस–नागरिक सहभागातून समाजहिताचा संदेश… – VIDARBHANEWS 24
आपला सिरोंचा

पोलीस दल स्थापना दिनानिमित्त सिरोंचात भव्य रक्तदान शिबिर; पोलीस–नागरिक सहभागातून समाजहिताचा संदेश…

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक: – ०८ जानेवारी २०२६ 
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचा मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी जपत गरजू व गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेला रक्तसाठा उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढते. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात असून, एका व्यक्तीने दिलेले रक्त अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकते, ही जाणीव ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः पुढाकार घेऊन सहभागी झाले असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. यामुळे पोलीस दल केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून, समाजाच्या आरोग्य व जीवनरक्षणासाठीही सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनबद्ध पद्धतीने शिबिराची आखणी करण्यात आली असून, रक्तदान प्रक्रियेदरम्यान आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्यात आली. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्री. फटिंग यांनी सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील आपुलकी व विश्वास अधिक दृढ होतो. पोलीस आणि जनता यांचे नाते मजबूत झाल्यास समाज अधिक सुरक्षित, संवेदनशील आणि सहकार्यशील बनतो.
पोलीस दल स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर म्हणजे सेवा, समर्पण आणि सामाजिक जबाबदारी यांचा उत्तम संगम असून, या उपक्रमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी सिरोंचा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मा. न्यायाधीश सर,तहसीलदार अजय साकुंदरवार व वनविभागीय अधिकारी नवलकिशन रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!