जिल्ह्यात १०१ धान खरेदी केंद्रे सुरू* *शेतकऱ्यांनी नोंदणीकृत केंद्रांवरच धान विक्री करावी – जिल्हाधिकारी*
शेतकऱ्यांनी नोंदणीकृत केंद्रांवरच धान विक्री करावी – जिल्हाधिकारी*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:–12/12/2025
– पणन हंगाम २०२५-२६ करिता गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने जिल्हा धान खरेदी समन्वय समितीकडून जिल्ह्यामध्ये एकूण १०१ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेली असून धानासाठी शासनाकडून रु. २३६९ इतका दर मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री न करता नजीकच्या धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
*मंजूर खरेदी केंद्रांचा तपशील:*
जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या एकूण १०१ धान खरेदी केंद्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
* मार्केटिंग फेडरेशन कार्यालय अंतर्गत: २१ खरेदी केंद्र.
* प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, गडचिरोली अंतर्गत: ४७ खरेदी केंद्र.
* उप प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, अहेरी अंतर्गत: ३३ खरेदी केंद्र.
धान विक्रीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असल्यास, शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधावा, असे
जिल्हा पुरवठा अधिकारी, सुधाकर पवार यांनी कळविले आहे.



