स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वूमीवर गडचिरोली जिल्ह्यात महायुतीत संघर्ष शिगेला..
माजी मंत्री आमदार धर्मराव आत्राम यांचे भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र... अन् दिला स्वबळाचा नारा..

संजय भोयर कार्यकारी संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क वृत्त विश्लेषण दिनांक:–12/10/2025
मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत अपेक्षित जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज चामोर्शी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसवांद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
विधानसभा निवडणूकीत भाजपने मला पाडण्यासाठी बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवाराला पाच कोटी रुपयांचा मदत केली असा आरोपही केला. खरे तर निवडून आल्यानंतर धर्मराव बाबांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल असा विश्वास होता मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते कमालीचे दुखावले आहे.गडचिरोली जिल्ह्यात स्टील प्रकल्पाची उभारणी झाली आहे आणि अनेक मोठ स्टील प्रकल्प येवू घातले आहे त्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण पूर्णतः बदलले आहे अशात जिल्हयातील राजकीय दृष्ट्या प्रस्थापित नेत्यांना फारसे स्थान मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे त्यांनी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे निधी वाटपात माझ्या मतदार संघात हस्तक्षेप करतात ते मी खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत ईथे फक्त माझाच शब्द चालणार अशी अधिकाऱ्यांना तंबी दिली. आणि आता भाजपने मला पाडण्यासाठी राजे अंबरीश राव आत्राम यांना पाच कोटी रुपयांची मदत दिल्याचा आरोपही केला.. त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता त्यामुळे सध्या त्यांनी महायुतीतील दोन्ही घटक पक्षाच्या नेत्यांना अंगावर घेतल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या 51 जागापैकी 32 जागा सोडल्या तरच युती करू असे त्यांनी सांगितले मात्र भाजप त्यांना इतक्या जागा सोडणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे. तिकडे शिवसेना शिंदे गट ही स्व बळाची चाचपणी करत आहे त्यामुळे भाजप एकट्याच्या बळावर किती जागा जिंकून आणते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.. कारण गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यामुळे भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यास त्यांची फार मोठी नामुष्की होणार आहे. त्यांच्या विजयासाठी उद्योग कंपनीने साम दाम दंड भेद नीतीचा वापर करत त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला,उद्योग कंपनीसाठी नेहमीच अनुकूल असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांनी आता अन्य जिल्हयाच्या अन्य भागात येणाऱ्या उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय एकही इचं शेतजमीन दिली जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत… जिल्हयाच्या तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आणि भाजपला एक प्रकार आव्हान दिले.. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता ईतर दोन मतदार संघात राष्ट्रवादीचा काँग्रेसला मर्यादा आहे हेही तितकेच खरे.. आता त्यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात आणि अजित पवार धर्मराव बाबांना कीती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे



