भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी हद्दीतील मौजा मरकणार येथील ग्रामस्थांनी केली माओवाद्यांना गावबंदी
*ग्रामस्थांनी 01 भरमार बंदुक पोलीसांना केली सुपूर्द * जानेवारी 2024 पासून अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एकूण 40 गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी....

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:–01/10/2025
सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वृद्धींगत झाला आहे आणि माओवादाचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे. यामुळेच सन 2024 व 2025 या दोन वर्षांमध्ये गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भामरागड उपविभागातील मौजा कवंडेसह एकुण 40 गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला आहे. यामुळे शासनाप्रती गडचिरोली येथील जनतेचा असलेला विश्वास अधोरेखीत झाला आहे.
दिनांक 09 फेब्राुवारी 2025 रोजी पोलीस दलामार्फत पोलीस स्टेशन, कोठी येथे घेण्यात आलेल्या जनसंपर्क बैठकी दरम्यान उपस्थित मौजा मरकणार येथील 55 ते 60 ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे कोठी यांना सादर केला होता. यासोबतच मरकणार येथील ग्रामस्थांनी पोलीस दलावरील आपला विश्वास अधोरेखित करीत काल दिनांक 30/09/2025 रोजी आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी एकत्रित येऊन एकमताने माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव पारीत करुन अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक यांना पोस्टे कोठी येथे सुपूर्द केला आहे. यावेळी गावातील 70 ते 75 नागरीक उपस्थित होते. यासोबतच गावातील नागरिकांनी 01 भरमार बंदूक देखील पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करुन माओवाद्यांच्या विरोधातील लढाईमध्ये आपण पोलीस दलाच्या बाजूने उभे आहोत असे आश्वासन दिले आहे. दिनांक 16 जुलै 2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने मौजा मरकणार ते अहेरी अशा बससेवेची सुरुवात करण्यात आली होती तसेच पोलीस दलाकडून राबविण्यात येणाया विविध नागरी कृती उपक्रमांमूळे जनतेचा गडचिरोली पोलीस दलाप्रती विश्वास वृद्धींगत होत असून जनता आता माओवादाच्या दहशतीला झुगारुन स्वत:हून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल होण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
मौजा मरकणार हे गाव गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाया अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने भूतकाळामध्ये या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. सदर ग्रामसभेदरम्यान अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन गडचिरोली पोलीस दल ठामपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आणि शासनातर्फे राबविण्यात येणाया विविध शासकिय योजनांचे महत्व पटवुन दिले. यासोबतच माओवाद्यांची भीती न बाळगता त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन माओवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला. गावकयांनी देखील यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवण/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक आणि युवक माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, गावातील जंगल परिसरात माओवाद्यांना थांबू देणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यात पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते तसेच पोस्टे कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. दिलीप गवळी व अधिकारी आणि अंमलदार यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाया गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवाद मुक्त जिल्हा करण्यात प्रशासनाची अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.