# सिरोंचा पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर — मराठा आरक्षणामुळे उमेदवारांची स्वप्नभंग, आता जिल्हा परिषदेकडे लक्ष – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

सिरोंचा पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर — मराठा आरक्षणामुळे उमेदवारांची स्वप्नभंग, आता जिल्हा परिषदेकडे लक्ष

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक:–13/10/2025

सिरोंचा तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार एकूण आठ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रक्रियेला मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

घोषित आरक्षण पुढीलप्रमाणे —
1️⃣ आसरेल्ली – सर्वसाधारण
2️⃣ जानमपल्ली – इतर मागासवर्गीय (OBC) स्त्री
3️⃣ झिंगानूर – अनुसूचित जमाती (ST) स्त्री
4️⃣ लक्ष्मीदेवीपेटा – अनुसूचित जमाती (ST) स्त्री
5️⃣ जाफराबाद – अनुसूचित जमाती (ST)
6️⃣ विट्ठलरावपेटा – अनुसूचित जमाती (ST)
7️⃣ नारायणपूर – अनुसूचित जाती (SC) स्त्री
8️⃣ अंकीसा – अनुसूचित जाती (SC)

संपूर्ण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या सोबत तहसीलदार होनमोरे, नायब तहसीलदार (निवडणूक) राजेश्वर मसराम, तसेच गटविकास अधिकारी कस्तुरे उपस्थित होते.

आरक्षणाची घोषणा होताच अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीबाबतची हालचाल सुरू झाली आहे. काही ठिकाणी समाधानाचे वातावरण असताना, काही ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बदलांमुळे असंतोष दिसून आला. अनेक संभाव्य उमेदवारांचे आरक्षण बदलल्याने त्यांची स्वप्ने भंग झाली असून, आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर केंद्रित झाले आहे.

राजकीय वर्तुळात या आरक्षणानंतर नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते पुढील रणनिती ठरविण्यासाठी बैठक घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

सिरोंचा तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडणुकीचा रंग आता अधिक चढू लागला असून, नागरिकांमध्येही पुढील निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!