_सेवा पंधरवाडा–२०२५ व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचा जागर – मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन…_*

गडचिरोली, प्रतिनिधी दिनांक :-14 सप्टेंबर 225
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीतर्फे सेवा पंधरवाडा–२०२५ व जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठक यमुना लॉन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. बैठकीत “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” या विषयावर मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देत प्रतिपादन करतांना म्हणाले की,
भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठीची संस्था नसून राष्ट्रसेवेचे विराट साधन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत नवा इतिहास घडवित असून आत्मनिर्भर भारत अभियान हे त्या परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे. ‘लोकल फॉर वोकल’च्या माध्यमातून स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार वाढला आहे; MSME, स्टार्टअप्स, शेती व डिजिटल उपक्रमांनी भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवले आहे.
आत्मनिर्भर भारत हे केवळ आर्थिक अभियान नाही, तर राष्ट्रनिर्माणाचे आंदोलन आहे. रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, उद्योजकतेला चालना आणि तंत्रज्ञानात नवोन्मेष हेच याचे मूलभूत स्तंभ आहेत.
कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी सांगितले की, “गावोगावी, घराघरांत स्वदेशीचा संदेश पोहोचवा आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता घडविण्याचा संकल्प करा.”असे प्रतिपादन या जिल्हा कार्यकारणी विस्तारित बैठकिला मा.खा.डाँ. अशोकजी नेते यांनी केले.
- *सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची माहिती*
यावेळी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रम जिल्हाभर व प्रत्येक मंडलावर आयोजित करण्यात यावा, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
*मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन*
या बैठकीत विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर,जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, सहकार महर्षी तथा जेष्ठ नेते अरविंद सा. पोरेङ्डीवार, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, नागपूरचे माजी आमदार सुधाकरजी कोहळे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ. रेखाताई डोळस, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा,अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डाँ. नितीनजी कोडवते, तसेच जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, गोविंदजी सारडा, सदानंद कुथे, गिताताई हिंगे,डॉ. चदाताई कोडवते,डॉ. संगिता रेवतकर, माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुतरमारे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, कि.मो.जिल्हाध्यक्ष विलास भांडेकर, भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष मधुकरजी भांडेकर, ओबिसी नेते अनिल पोहनकर,तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर,रंजिता कोडापे, यांच्यासह मंडल अध्यक्ष तसेच जिल्हयातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान भाजपाच्या संघटनात्मक धोरणावरही विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हयात भाजपा संघटनेला नव बळ मिळाले असुन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना नवी संजीवनी प्राप्त होत आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाला गडचिरोली जिल्ह्यात जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.