ब्रेकिंग न्यूज – अभूझमाडात मोठा पराभव; केंद्रीय समितीचे दोन माओवादी कमांडर कंठस्नान

नारायणपूर, (छत्तीसगड) दिनांक:–22 सप्टेंबर 2025 (विदर्भ न्यूज 24 विशेष प्रतिनिधी):
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील अभूझमाड जंगल परिसरात आज सकाळपासून सुरू असलेल्या मुठभेड़ीनंतर अखेर सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल तीन दशकांपासून दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीत सक्रिय असलेले सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीचे दोन शीर्ष कमांडर – राजू दादा @ कट्टा रामचंद्र रेड्डी (वय 63) आणि कोसा दादा @ कादरी सत्यनारायण रेड्डी (वय 67) मुठभेड़ीत ठार झाले आहेत.
दोघांवरही छत्तीसगड सरकारकडून प्रत्येकी ₹40 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
— मुठभेड़ीतील महत्त्वाची माहिती :
मुठभेड़ स्थळावरून AK-47 रायफल, एक इंसास रायफल, एक BGL लॉंचर, मोठ्या प्रमाणावर स्फोटके, माओवादी साहित्य व अन्य साहित्य जप्त.
सकाळपासून अधूनमधून सुरू असलेली गोळीबाराची देवाणघेवाण संध्याकाळी निर्णायक ठरली.
घटनास्थळावरून दोन्ही पुरुष माओवादी कॅडरांचे मृतदेह मिळाले.
दोन्हीही कॅडर मूळचे करीमनगर, तेलंगणा जिल्ह्यातील.
पोलिसांकडून इतर राज्ये व राष्ट्रीय एजन्सीकडून असलेल्या इनाम व गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती एकत्रित केली जात आहे.
माओवादी कॅडरांची प्रोफाईल
1️⃣ राजू दादा @ कट्टा रामचंद्र रेड्डी @ गुडसा उसेंदी @ विजय @ विकल्प
वय: 63 वर्षे | पिताश्री: मल्ला रेड्डी | मूळ निवासी – करीमनगर, तेलंगणा
पद: केंद्रीय समिती सदस्य, सीपीआय (माओवादी)
इनाम: ₹40 लाख (छत्तीसगड राज्य)
2️⃣ कोसा दादा @ कादरी सत्यनारायण रेड्डी @ गोपन्ना @ बुचन्ना
वय: 67 वर्षे | पिताश्री: कृष्णा रेड्डी | मूळ निवासी – करीमनगर, तेलंगणा
पद: केंद्रीय समिती सदस्य, सीपीआय (माओवादी)
इनाम: ₹40 लाख (छत्तीसगड राज्य)
— अधिकाऱ्यांचे निवेदन
➡ नारायणपूर जिल्हा पोलिस अधीक्षक रॉबिन्सन यांनी सांगितले की अभूझमाड भागात माओवादी उपस्थितीबाबत गुप्त माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
➡ या दरम्यान झालेल्या चकमकीत केंद्रीय समितीच्या दोन्ही मोठ्या नेत्यांचा खात्मा झाला.
➡ बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, “या कारवाईमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. कठीण भौगोलिक परिस्थितीतदेखील सुरक्षा दल अत्यंत निष्ठा व समर्पणाने काम करत आहेत.”
➡ त्यांनी पुन्हा एकदा माओवादी कैडरांना हिंसा सोडून आत्मसमर्पण धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
— विदर्भ न्यूज 24 सतत अपडेट्स देत राहील…
—