# पोस्टे वांगेतुरी हद्दीतील नागरिकांनी भरमार बंदुका व बॅरल केले गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

पोस्टे वांगेतुरी हद्दीतील नागरिकांनी भरमार बंदुका व बॅरल केले गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन

एकुण 26 नग भरमार बंदुका व 11 नग बंदुकीचे बॅरल केले पोलीसांच्या स्वाधीन

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :- 24/10/2025

गडचिरोली जिल्ह्रात मोठ¬ा प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम-अतिदुर्गम भागात माओवादी याच बाबीचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याचे परिस्थितीत जेव्हा मागील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्रातील एकही तरूण माओवादी चळवळीत भरती झालेला नाही तसेच गडचिरोली जिल्ह्रात मोजकेच सशत्र माओवादी शिल्लक असताना, या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी नागरिकांना स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधीन कराव्या असे आवाहन केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोस्टे वांगेतुरी हद्दीतील मौजा हिंदुर, नैनवाडी, तोडगट्टा या दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या 26 भरमार बंदुका व 11 नग बंदुकीचे बॅरल पोस्टे वांगेतुरी येथे स्वाधीन केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर यांचे नेतृत्वात पोस्टे वांगेतुरी येथील प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे, पोस्टे वांगेतुरी येथील अंमलदार तसेच सिआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी राबविलेल्या प्रभावी नागरीकृती उपक्रमांमूळे वांगेतुरी हद्दीतील नागरीक माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये सामिल होताना दिसून येत आहेत. सन 2022 मध्ये एकूण 73, सन 2023 मध्ये 46 व सन 2024 मध्ये एकूण 26 तसेच सन 2025 मध्ये आतापर्यंत एकुण 29 भरमार बंदूका व 12 बंदुकीचे बॅरल जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलासमक्ष स्वाधीन केले आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी आतापर्यंत एकुण 365 भरमार बंदुका पोलीस दलासमक्ष स्वाधीन केल्या आहेत.
मागील तीन वर्षात इतक्या मोठ¬ा प्रमाणात भरमार बंदूका जिल्ह्रातील नागरिकांनी पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत, हे पाहता येथील नागरिकांच्या मनात गडचिरोली पोलीस दलाप्रति विश्वास दृढ होताना व गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या नागरीकृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमूळे जिल्ह्रातील नागरिक आता माओवादाच्या भयापासून मूक्त होताना दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी सदर कामगिरी करीता परिश्रम घेणा-या अधिकारी व अंमलदारांचे तसेच पोलीस दलाप्रती विश्वास दाखवून भरमार बंदुका पोलीस दलाकडे स्वाधीन करणा­या नागरिकांचे कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. योगेश रांजणकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे वांगेतुरी येथील प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!