गडचिरोली विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक:-02 फेब्रुवारी 2026
भामरागड उपविभागात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दिनांक ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वात C-60 च्या १४ पथकांसह मौजा फोदेवाडा परिसरात, नारायणपूर–गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर शोधमोहीम राबविण्यात आली.
काल दिवसा झालेल्या चकमकीत माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त झाले. मात्र, घनदाट जंगल व प्रतिकूल भूभागामुळे माओवादी पसार झाले होते.
आज सकाळी कारवाईला आणखी धार देत अतिरिक्त ०४ C-60 पथक आणि CRPF QAT चे ०१ पथक अभियानात दाखल झाले. सकाळपासून अधूनमधून झालेल्या चकमकीत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यासोबत १ AK-47 आणि १ SLR रायफल जप्त करण्यात आली आहे. मृत माओवाद्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा झालेल्या जोरदार गोळीबारात C-60 चा एक जवान जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परिसरात शोधमोहीम सुरूच असून, अभियान संपल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
📌 विदर्भ न्यूज 24 – अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा.

