गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी दिनांक 26 फेब्रुवारी 2026
गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .
पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसकर कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता श्री. राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
०००
