# बीएसएनएल सेवा दिवाळीच्या “सुट्टीवर”! चार दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात ठप्प नेटवर्कमुळे व्यवहार कोलमडले, नागरिक त्रस्त…. – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

बीएसएनएल सेवा दिवाळीच्या “सुट्टीवर”! चार दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात ठप्प नेटवर्कमुळे व्यवहार कोलमडले, नागरिक त्रस्त….

खासदार साहेबांनी घ्यावे तात्काळ लक्ष द्यावे असे नागरिकांची मागणी

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 30 सप्टेंबर 2025 

सिरोंचा तालुका │ “बीएसएनएल सुट्टीवर गेलंय का?” — हा प्रश्न सध्या सिरोंचा परिसरातील प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प असून, त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे.

रेगुंटा, आसरंअल्ली, झिंगानूर, सिरोंचा अशा भागात बीएसएनएल ही प्रमुख सेवा असल्याने, नेटवर्क बंद पडल्याने बँकिंग व्यवहार, ऑनलाईन सेवा, ई-गव्हर्नन्स कामे आणि डिजिटल व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. नागरिकांना थेट अडचणीतून जावे लागत आहे.

नेटवर्क बंद असल्याने श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा पेन्शन यांसारख्या योजनांचे लाभार्थी बँकेत येऊनही रिकाम्या हाताने परत जात आहेत. बँकिंग सेवांसाठी लोकांना दररोज दोनशे-तीनशे रुपये खर्च करून 50-60 किलोमीटर प्रवास करावा लागतो, मात्र नेटवर्क नसल्याने “सर्व्हर डाऊन” असा संदेश मिळतो आणि दिवस वाया जातो.

एका वृद्ध नागरिकाने संतप्तपणे सांगितले —

> “दर दोन दिवसांनी बँकेत जातो, पण नेटवर्क नाही. पैसे मिळत नाहीत, प्रवासाचा खर्च वाया जातो. सरकारने आमचा विचार करावा.”

भारतातील अनेक शहरे  अनेक क्षेत्रांत प्रगतीपथावर असताना, बीएसएनएल सेवेमुळे मात्र ‘डिजिटल मागासलेपणाचे’ ओझे अजूनही लोकांच्या खांद्यावर आहे. अनेक बीएसएनएल ग्राहक नेटबँकिंगसाठी रिचार्ज करतात, पण नेटवर्कच्या अभावामुळे त्यांचा रिचार्ज व्यर्थ जातो, पैसे वाया जातात. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येकडे अजूनही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की, खासदार साहेबांनी वैयक्तिक पातळीवर या प्रश्नावर लक्ष घालून बीएसएनएल प्रशासनाशी चर्चा करावी आणि तातडीने समस्या सोडवावी.

“डिजिटल इंडिया”च्या घोषणांमधील वास्तव या नेटवर्क बंदीमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्हासमोर उभे राहिले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित मोबाईल नेटवर्क आणि सेवा मिळणे ही आज काळाची गरज बनली आहे.

चार दिवस झाले तरी बीएसएनएल सेवा ठप्प —
दिवाळी निघून गेली पण नेटवर्क अजून परतलंच नाही!

संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!