अहेरी विधानसभा विकासाच्या नव्या पर्वाकडे – आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची नवी दिशा…

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-04/11/2025
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासाचा वेग काही काळ थांबलेला असल्याची चर्चा नुकत्याच झालेल्या अहवालांमधून पुढे आली असली, तरी प्रत्यक्षात मागील काही वर्षांपासून या मतदारसंघात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले जिल्ह्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विकासाचा ठोस आराखडा उभा करत नवे दिशादर्शन केले आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा बळकटीकरण, ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मिती यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. अहेरी–सिरोंचा रस्ता, ग्रामपंचायतीमार्फत चालणारे विविध विकासकामे, तसेच आदिवासी भागातील मूलभूत सुविधा यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अंतर्गत राजकीय मतभेद आणि विरोधकांच्या आव्हानांचा सामना करत त्यांनी सर्व घटकांना एकत्र आणत “विकासासाठी एकजूट” हा नवा संदेश दिला आहे.
अहेरी विधानसभेतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, तसेच आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यावरही आ. आत्राम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिरे, शाळा सुधारणा उपक्रम, तरुणांसाठी रोजगार मेळावे, तसेच महिला बचतगटांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम राबवले जात आहेत.
अलीकडच्या काळात काही ठिकाणी अद्याप अडचणी आणि कामांचा मंद वेग असल्याचे मान्य करत, आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी या सर्व समस्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांचा विकासाचा ध्यास आणि लोकांशी थेट संवादाची भूमिका यामुळे मतदारांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागाला स्वावलंबनाकडे नेण्याचा आणि सर्वांगीण विकास घडवण्याचा निर्धार घेऊन ते काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक अपूर्ण प्रश्न मार्गी लागतील, आणि विकासाच्या नव्या युगाची सुरुवात अधिक ठोसपणे दिसेल, असा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे.



