दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली पोलिसांकडून विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन : आत्मविश्वास व सामाजिक जाणिवेचा सकारात्मक अनुभव

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 विशेष वार्ताहर दिनांक :-29 जुलै 2025. गडचिरोली पोलीस दल केवळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीपुरते मर्यादित न राहता, समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकीचे भान जपत विविध उपक्रम राबवत आहे. त्याच सामाजिक जाणीवेच्या भावनेतून आज, दि. 29 जुलै 2025 रोजी, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
—तीन निवासी विशेष शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग. या उपक्रमात निवासी अपंग विद्यालय, लांजेडा, निवासी मुक व बधीर विद्यालय, गडचिरोली, आणि कौसल्या निवासी मतीमंद विद्यालय, बोदली येथील अस्थिव्यंग, मुकबधीर आणि मतीमंद विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे ही विशेष सहल आयोजित करण्यात आली.
––पोलीस यंत्रणेची जवळून ओळख. विद्यार्थ्यांना पोलीस मुख्यालय, शस्त्रागार, विशेष अभियान पथक आणि आयुधिक कर्मशाळांना भेटी देण्याची संधी मिळाली. त्यांनी पोलीस दलातील शिस्तबद्धता, कार्यपद्धती आणि विविध शस्त्रसामग्रीची माहिती मिळवली. काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्र हाताळण्याचा अनुभव देखील मिळाला.
या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून सामाजिक जाणीव अधिक जागृत झाली, तसेच पोलीस दलाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा एक अविस्मरणीय क्षण विद्यार्थ्यांना लाभला.
–-शैक्षणिक आणि खेळाचे साहित्य वाटप
या सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुढील साहित्य प्रदान करण्यात आले:शैक्षणिक साहित्य : स्कूलबॅग, कंपास, एलसीडी पॅनल बोर्ड, शैक्षणिक तक्ते,खेळाचे साहित्य : क्रिकेट किट, फुटबॉल, लगोरी, रुबिक्स क्युब इ.सदर साहित्याचे वाटप पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले.
—पोलीस अधीक्षकांचा प्रोत्साहनपर संदेश. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले,
> “दिव्यांग असणे ही मर्यादा नसून, ती संधी आहे. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून मोठे ध्येय ठेवा आणि जिद्द व चिकाटीने प्रयत्न करत राहा. अनेक दिव्यांगांनी युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे, तुम्हीही मिळवू शकता.”
—उपस्थित मान्यवर आणि आयोजन समिती कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते:श्री. नीलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली,श्री. एम. रमेश – अपर पोलीस अधीक्षक (अभियान),श्री. गोकुल राज जी. – अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन),श्री. विशाल नागरगोजे – पोलीस उप-अधीक्षक (अभियान),श्रीमती लक्ष्मी केतकर – मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय,श्री. सुभाष हर्षे – मुख्याध्यापक, निवासी अपंग विद्यालय, लांजेडा,श्री. अविनाथ हारगुडे – अधीक्षक, मुक व बधीर विद्यालय,श्री. शशिकांत शंकरपुरे – मानसशास्त्रज्ञ, कौसल्या विद्यालय, बोदली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समर्पित प्रयत्न
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढील अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले:रा.पो.नि. अनुजकुमार मडामे,पो.उ.नि. नरेंद्र पिवाल – पोलीस कल्याण शाखा,पो.उ.नि. संतोष कोळी,पोलीस मुख्यालय व कल्याण शाखेचे अंमलदार
–हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी फक्त एक शैक्षणिक सहल नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा सकारात्मक सामाजिक हस्तक्षेप ठरला आहे. गडचिरोली पोलीस दलाचे हे कार्य इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
–— – प्रतिनिधी, विदर्भ न्यूज 24
pzie8x