कोनसरीत ट्रक – काळीपिवळी सुमो चा अपघात.. चार जण जखमी…. सुदैवाने जीवितहानी टळली…

आष्टी – विशेष प्रतिनिधी दिनांक:-02/08/2025. ट्रकची काळी पिवळी सुमो ला धडक बसुन चार जण जखमी झाले. ही घटना दिनांक दोन ऑगस्ट शनिवारी दुपारच्या गडचिरोली चामोर्शी मार्गावरील कोनसरी येथे दुपारच्या सुमारास घडली.
रामगोपाल सुदाम खवास वय 53 वर्ष रा. ताडगाव
प्रशांत राजकुमार मेश्राम वय 37 वर्ष काळी पिवळी चालक रा. चामोर्शी, कविता किशोर सोनटक्के वय 58 वर्ष रा.गडचिरोली मारोती गणपती पुज्जलवार वय 70 वर्ष रा. रामसागर असे जखमीचे नाव आहे
काळी पिवळी सुमो क्रमांक MH 33 A-394 ही आष्टी वरून प्रवासी घेवुन चामोर्शी कडे जात असताना कोनसरी बस स्टॉप नजिक विरुद्ध दिशेने अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक ने समोरा समोर जबर धडक दिली यात काळी पिवळी सुमो मधील चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरीत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. ट्रक चालकाला पोलीसांनी अटक केली असुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.