# लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे उत्साहात साजरा केला स्वातंत्र्यदिन – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे उत्साहात साजरा केला स्वातंत्र्यदिन

Amazon.in/ONLINE SHOPPING

कोनसरी / सुरजागड प्रतिनिधी दिनांक 16 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथील एलएमईएल (लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड) प्रकल्प व सुरजागड लोहखनिज खाण येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील मान्यवर, स्थानिक नागरिक, विद्यार्थी व एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कोनसरी प्रकल्पातील प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री. श्रीकांत पावडे उपस्थित होते. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. नागोबाजी पेद्दापल्लीवार, श्री. अभिजित बंडावार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच एलएमईएल अधिकारी विशेषतः उपस्थित होते.

         स्वागत समारंभात स्थानिक आदिवासी बांधव-भगिनींनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. प्रकल्प सुरक्षा यंत्रणा, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन व कॅम्प सेफ्टी चमू तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व प्रभावी परेडचे सादरीकरण करून सर्वांचे मन जिंकले. एलएमईएलकडून छिंदवाडा येथे वाहन प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनीही या संचलनात सहभाग घेऊन महिलांच्या सामर्थ्याची झलक दाखवली.

       परेडनंतर मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना विविध स्पर्धांतील बक्षिसे प्रदान केली. एलएमईएलच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

दरम्यान, सुरजागड लोहखनिज खाण येथेही स्वतंत्र ध्वजारोहण व परेड सोहळा पार पडला. गावातील मान्यवर, एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

           यावेळी देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण सोहळा आणि राष्ट्रीय एकतेचे संदेश यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने उजळून निघाला.

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker