पुरस्कार नव्हे… जनसेवेची प्रेरणा!…….
आ. सुधीर मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या मानाच्या सन्मानाने गौरव.

लंडन विशेष प्रतिनिधी दिनांक:-19/08/2025
लोकमत समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेन्शनमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष मा. श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या हस्ते राज्याचे वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले.
. या सन्मानाचा स्वीकार आ. मुनगंटीवार यांनी सपत्नीक केला. हा क्षण त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासातील अविस्मरणीय ठरला.
सन्मानाबद्दल आपला अभिप्राय व्यक्त करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “हा केवळ पुरस्कार नाही, तर जनसेवेच्या अखंड प्रवासाला लाभलेली प्रेरणा आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करत राहीन.”
त्यांनी पुढे सांगितले की, समाजकल्याणासाठीची निस्वार्थी तळमळ आणि कामातील प्रामाणिकपणा यामुळेच लोकमत समूहाने आपली निवड केली. हा बहुमान आपल्याला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो आणि सेवाभाव अधिक दृढ करतो.
या प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. सपना मुनगंटीवार यांची उपस्थिती हा क्षण अधिक खास ठरल्याचे त्यांनी नमूद केले. “माझ्या जनसेवेच्या मार्गावर त्यांच्या अखंड पाठबळामुळेच मी ठामपणे पुढे जात आहे,” असेही त्यांनी भावुक शब्दांत सांगितले.
हा सन्मान त्यांनी जनतेलाच अर्पण केला. “जनतेचा विश्वास, आशीर्वाद आणि साथ हीच माझ्या जनजीवनाची खरी प्रेरणा आहे. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो,” असे आ. मुनगंटीवार यांनी कृतज्ञतेने सांगितले.
ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेन्शनमधील या गौरवामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्याचे जागतिक पातळीवर कौतुक झाले आहे.
#VidarbhaNews24 #Lokmat #London2025 #LokmatGlobalEconomicConvention #KohinoorOfIndia #SudhirMungantiwar #RahulNarwekar #Maharashtra #जनसेवेचीप्रेरणा