पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत… अनेक मार्ग बंद….

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 19 ऑगस्ट 2025 गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद झाले असून ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
बंद मार्गांची यादी :
1. हेमलकसा–भामरागड राष्ट्रीय महामार्ग 130 डी (पर्लकोटा नदी), ता. भामरागड
2. अहेरी–वटरा रस्ता, राज्यमार्ग 370 (वटरा नाला), ता. अहेरी
3. तळोधी–आमगाव–महाल विसापूर रस्ता, राज्यमार्ग 381 (पोहार नदी), ता. चामोर्शी
4. कुरखेडा–वैरागड रस्ता, राज्यमार्ग 377 (सती नदी), ता. कुरखेडा
5. चौडमपल्ली–चपराळा रस्ता, प्रजिमा 53 (स्थानिक नाला), ता. चामोर्शी
6. काढोली–उराडी रस्ता, प्रजिमा 7 (स्थानिक नाला), ता. कुरखेडा
7. शंकरपूर–डोंगरगाव रस्ता, प्रजिमा 1, ता. देसाईगंज
8. कोकडी–तुलशी रस्ता, प्रजिमा 49, ता. देसाईगंज
9. कोंढाळा–कुरुड–वडसा रस्ता, प्रजिमा 47, ता. देसाईगंज
10. पोरला–वडधा रस्ता, प्रजिमा 7, ता. कुरखेडा
11. भेंडाळा–बोरी–गणपूर रस्ता, प्रजिमा 17 (हळदीमाल नाला)
12. हलवेर–कोठी रस्ता, इजीमा 24, ता. भामरागड
13. गडचिरोली–चांडाळा–गुरवळा रस्ता, राज्यमार्ग 379, ता. गडचिरोली
परिस्थिती गंभीर
पुरामुळे ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक सेवांचा पुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. रुग्णवाहिका सेवा, शेतमालाची वाहतूक तसेच शाळा–कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले आहेत. काही ठिकाणी गाव पूर्णपणे अलगद झाले असून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
प्रशासनाचे आवाहन
गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून, बंद मार्गांचा वापर टाळावा असे आवाहन केले आहे. पूर ओसरल्याशिवाय या मार्गांवरील वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
#VidarbhaNews24 #Gadchiroli #FloodUpdate #पुरस्थिती #गडचिरोलीपूर #RoadClosed #DisasterManagement #Maharashtra