गडचिरोली–नारायणपूर सीमेवर भीषण चकमक : चार जहाल माओवादी ठार…
मुसळधार पावसातही शोधमोहीम;८ तास चालली☠️ ४ माओवादी ठार – शस्त्रसाठा जप्त भीषण चकमक; मृतकांमध्ये,01 पुरुष आणि 03 महिला) असे आहे

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:– 27 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील दुर्गम कोपर्शी जंगल परिसरात काल, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासून सुरू झालेल्या मोहिमेत पोलिस दल आणि माओवादी यांच्यात जवळपास आठ तास भीषण चकमक झाली. या चकमकीत एकूण चार जहाल माओवादी ठार झाले असून, त्यात एक पुरुष आणि तीन महिला माओवादींचा समावेश आहे. या कारवाईनंतर घटनास्थळावरून पोलिसांनी अत्याधुनिक शस्त्रसाठा देखील हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० तसेच इतर माओवादी कार्यकर्ते कोपर्शी जंगल परिसरात दबा धरून बसले असल्याची विश्वासार्ह व गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश यांनी तात्काळ मोठ्या प्रमाणावर कारवाईचे नियोजन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली C-60 चे १९ पथके व CRPF QAT ची २ पथके रवाना करण्यात आली. अत्यंत दुर्गम व दाट जंगल, शिवाय सतत कोसळणारा पाऊस या परिस्थितीत पोलिस पथकांनी दोन दिवस कठीण मार्गक्रमण करून अखेर काल सकाळी कोपर्शी परिसरात पोहोचले.
सदर जंगल परिसरात शोधमोहीम राबवित असताना अचानक माओवाद्यांनी पोलिस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्याला पोलिस पथकांनीही तत्काळ व प्रभावी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जवळपास आठ तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू राहिला. मुसळधार पावसाच्या कडाक्यात, दाट जंगल व दुर्गम भौगोलिक परिस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शेवटी पोलिसांच्या प्रबळ दबावामुळे माओवादी दल मागे हटले.
चकमक शांत झाल्यानंतर पोलिसांनी परिसराची झाडाझडती घेतली असता, एकूण चार जहाल माओवादी मृतावस्थेत आढळले. त्यापैकी एक पुरुष तर तीन महिला माओवादींचा समावेश आहे. घटनास्थळी मिळालेल्या मृतदेहांबरोबरच पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे. यात एक SLR रायफल, दोन INSAS रायफल्स आणि एक .303 रायफल यांचा समावेश आहे. या शस्त्रसाठ्यामुळे माओवादी पथक मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चकमकीनंतर काही माओवादी जंगलाच्या आतील भागात पळून गेल्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे माओवादीविरोधी अभियान अद्याप सुरूच आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून, पोलिसांकडून कोणत्याही संशयित हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे.
गडचिरोली–नारायणपूर सीमावर्ती भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून माओवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध asराहिला आहे. या भागात सलग सुरू असलेल्या कारवायांमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या चळवळीचे पायाभूत ढांचे खिळखिळे होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
️ मुसळधार पावसातही शोधमोहीम
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलिस पथकांना जंगल परिसरात पोहोचण्यात अडचणी येत होत्या. अखेर आज सकाळी पथकांनी या भागात पोहोचून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली.
८ तास चालली भीषण चकमक
दरम्यान, माओवाद्यांनी पोलिस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत प्रभावी कारवाई केली. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर परिसर सुरक्षित करण्यात आला.
☠️ ४ माओवादी ठार – शस्त्रसाठा जप्त
शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळी १ पुरुष व ३ महिला अशा एकूण ४ जहाल माओवादींचे मृतदेह मिळून आले.
याशिवाय पोलिसांनी ०१ SLR रायफल, ०२ INSAS रायफल आणि ०१ .303 रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
*✍ संपादक – विदर्भ न्यूज 24
www.vidarbhanews24.com