# गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई –मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस, मुख्य आरोपींसह संपूर्ण टोळी जेरबंद – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई –मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस, मुख्य आरोपींसह संपूर्ण टोळी जेरबंद

गडचिरोली पोलीसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे 08 विविध गुन्हे उघडकीस आणून आरोपींना केली अटकगुप्त पाळत आणि संशयास्पद वाहनापासून उलगडली गुन्ह्यांची साखळी...चोरलेल्या बॅटऱ्यांची गडचिरोली ते कागजनगर अशी अवैध विक्री साखळी....* स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोस्टे अहेरी, ताडगाव; उपपोस्टे पेरमिली, राजाराम (खां) व पोमकें येमली बुर्गीसह पोस्टे गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथे दाखल एकूण 09 गुन्हे आणले उघडकीस * चारचाकी वाहन व रोख रक्कमेसह एकूण 05 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.....

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक: – 07/12/2025,

गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणाखाली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये देखील मोठ¬ा प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यावरुन कौशल्यपूर्ण तपास करुन स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणावरुन मोबाईल टॉवर बॅट­या चोरी करणा­या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्रातील संवेदनशिल भागातील कांदोली, गुरज्या, येमली, राजाराम खांदला, तलवाडा, ताडगाव, वेदमपल्ली गावातील वाढत्या मोबाईल टॉवर बॅट­या चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतत 15 दिवस संवेदनशिल भागात पाळत ठेवली असता, एक पिकअप वाहन रात्रीच्या वेळी टॉवर असलेल्या गावात संशयीतरीत्या फिरत असल्याचे मिळून आले. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय बातमीदारांमार्फत सदर वाहन ताब्यात असणारा गोविंद खंडेलवार, वय 19 वर्षे, रा. आलापल्ली जि. गडचिरोली याचा शोध घेऊन त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, सदरचे वाहन देखील चोरीचे असून सदर वाहनाचा वापर करुन गोविंद खंडेलवार हा उमेश मनोहर इंगोले वय 38 वर्षे, रा. नेहरुनगर गडचिरोली व इतर दोन साथीदारांच्या मदतीने वर नमूद गावांतील मोबाईल टॉवरच्या बॅट­यांची चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चोरी केलेल्या बॅट­या अहेरी येथीत तिरुपती व्यंकया दासरी, वय 38 वर्षे रा. अहेरी, जि. गडचिरोली यांना विक्री केल्याचे सांगितले व व्यंकया दासरी यांने सदर बॅट­या कागजनगर येथील याकुब शेख याला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेल्या बॅट­यांची व साहित्यांची आरोपीतांनी विल्हेवाट लावली असल्याचे निष्पन्न झाले असून, बॅटरी विक्री करुन आरोपीतांनी मिळविलेली रोख रक्कम 02 लाख रुपये, चोरी गेलेल्या बॅट­यांचे इतर साहित्य, चारचाकी पिकअप वाहन किंमत अंदाजे 03 लाख रुपये असा एकूण 05 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपीतांकडून जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपीतांकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान, पोस्टे अहेरी येथील 02 गुन्हे, उपपोस्टे पेरमिली येथील 02 गुन्हे, पोस्टे येमली बुर्गी येथील 02 गुन्हे, पोस्टे ताडगाव येथील 01 गुन्हा, राजाराम (खां.) येथील 01 गुन्हा असे एकूण मोबाईल टॉवर बॅट­या चोरीचे 08 गुन्हे तसेच पोस्टे गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील वाहन चोरीचा 01 गुन्हा असे एकूण 09 गुन्हे तपासादरम्यान उघडकीस आले आहेत. सदर आरोपी सध्या पोमकें येमली बुर्गी येथील गुन्ह्रात अटकेत असून सर्व गुन्ह्रांचा तपास गडचिरोली पोलीसांकडून केला जात आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. अरुण फेगडे यांचे नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोउपनि. विकास चव्हाण, मपोउपनि. इंगोले, पोहवा/सतिश कत्तीवार, पोअं/राजु पंचफुलीवार, पोअं/शिवप्रसाद करमे, पोअं/श्रीकांत बोईना, पोअं/धनंजय चौधरी, चापोअं/दिपक लोणारे, चापोअं/गणेश वाकडोतपवार, मपोअं/सुजाता ठोंबरे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!