# गडचिरोली जिल्ह्यात भाजपचा ऐतिहासिक क्लीन स्वीप…. – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात भाजपचा ऐतिहासिक क्लीन स्वीप….

गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:–21 डिसेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदांवर दणदणीत विजय मिळवत जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. “तीनही नगरपरिषदा – एकच पक्ष” असा स्पष्ट जनादेश देत मतदारांनी भाजपावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे

.गडचिरोलीत प्रणोती निंबोरकर यांचा ऐतिहासिक विजय

गडचिरोली नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. या विश्वासाला मतदारांनी मतपेटीतून ठोस उत्तर दिले.

आरमोरीत रुपेश पुणेकर यांना जनतेचा कौल
आरमोरी नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार रुपेश पुणेकर यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवला आहे. शहर विकासासाठी ठोस भूमिका, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे आरमोरीत भाजपचा झेंडा फडकला आहे.

देसाईगंजमध्ये लता सुंदरकर यांचा दणदणीत विजय
देसाईगंज नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार लता सुंदरकर यांनी विजय मिळवत भाजपच्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. महिला नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकत विकासाभिमुख राजकारणाला पाठबळ दिले आहे.

संघटनशक्तीचा परिणाम
निवडणूक काळात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नेतृत्वाने एकसंघपणे मेहनत घेतली. घराघरांत पोहोचलेला प्रचार, केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजनांचा प्रभावी प्रचार आणि मजबूत संघटनात्मक बांधणी यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.

जिल्हाभर भाजपचा दबदबा
गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तीनही नगरपरिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. याचबरोबर या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले असून, नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विजयानंतरचा निर्धार
विजयानंतर प्रतिक्रिया देताना गडचिरोली नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर म्हणाल्या,
“हा विजय माझा नसून गडचिरोलीच्या जनतेचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रामाणिकपणे

काम करण्याचा माझा ठाम निर्धार आहे.”
एकूणच, गडचिरोली जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांवर मिळवलेला हा विजय भाजपसाठी केवळ निवडणूक यश नसून, आगामी काळात विकास, पारदर्शकता आणि मजबूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानले जात आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!