भव्य बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आर्य वैश्य युवा मंडळाचा समाजएकतेचा सुंदर उपक्रम…

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:–28 /12/2025
अहेरी शहरातील माता कन्यका परमेश्वरी देवस्थानासमोरील पटांगणावर आर्य वैश्य युवा मंडळ अहेरी यांच्या वतीने समाज बांधवांसाठी भव्य दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खेळ, आरोग्य आणि सामाजिक सलोखा यांचा त्रिवेणी संगम साधणारी ही स्पर्धा २६ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेत पुरुष गटातून तब्बल १८ संघांनी, तर महिला गटातून १४ संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला चांगलाच रंग भरला आहे. आजच्या डिजिटल युगात मैदानावर घाम गाळत खेळणारी तरुणाई पाहून “जुनी शाळा अजून जिवंत आहे” हेच सिद्ध झाले, असे अनेकांनी आवर्जून नमूद केले.
स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक ३००१ रुपये महेश मद्देर्लावार यांच्याकडून, तर द्वितीय पारितोषिक २००१ रुपये राहुल दोतुलवार यांच्याकडून देण्यात येणार आहे.
महिला गटासाठी प्रथम पारितोषिक ३००१ रुपये अनुप बिरेल्लीवार यांच्याकडून, तर द्वितीय पारितोषिक २००१ रुपये रक्षित नरहरशेट्टीवार यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी संजय चिमरालवार हे होते. यावेळी दिपक उत्तरवार, राहुल विजय मद्देर्लावार, राहुल दोंतुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मद्देर्लावार यांनी उत्तमरित्या पार पाडले.
आर्य वैश्य युवा मंडळ अहेरी यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे समाजातील युवक-युवतींना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून, एकोप्याची भावना अधिक दृढ होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी एकजुटीने परिश्रम घेतले.
खेळाच्या माध्यमातून समाज बांधणीचा संदेश देणारी ही स्पर्धा अहेरीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.



