अबुजमाड / भामरागड विशेष प्रतिनिधी दिनांक 6 फेब्रुवारी 2026
अबुजमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीदरम्यान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे जवान गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना रात्रीच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भामरागड येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे नेण्यात येणार आहे.
दरम्यान, सदर जंगल परिसरात माओवादी उपस्थितीची शक्यता लक्षात घेता शोध मोहीम अद्याप सुरू असून संपूर्ण क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संदर्भात गडचिरोली पोलीस दलाकडून पुढील अधिकृत माहिती वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अबुजमाडसारख्या दुर्गम व धोकादायक भागातही पोलिस दल माओवादी आव्हानाला ठामपणे सामोरे जात असून, जवानांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
— विदर्भ न्यूज 24
