एटापल्ली (जि. गडचिरोली) | दिनांक: २० एप्रिल २०२६
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काहीजण “सिस्टमला चकवा” देण्याचा प्रयत्न करतायत, पण पोलीसही आता “नो नॉनसेन्स मोड” मध्ये आले आहेत. एटापल्ली पोलिसांनी सापळा रचत मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १९ एप्रिल रोजी एटापल्ली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनातून देशी-विदेशी दारूची तस्करी होणार आहे.
माहिती मिळताच पोलीस पथकाने वेगवेगळ्या मार्गांवर सापळा रचला. नारानूर–ताइपल्ली मार्गावरून लांझीकडे येणारे संशयित वाहन (क्रमांक MH 32 AS 7099) अडवण्यात आले. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली.
🔍 जप्त मुद्देमाल:
-
२९ सिलबंद पेट्या ‘रॉकेट’ देशी दारू (संत्रा कंपनी)
-
१ पेटी बिअर
-
एकूण दारू साठा किंमत: ₹२,९०,०००
-
महिंद्रा धार चारचाकी वाहन किंमत: ₹१२,००,०००👉 एकूण जप्ती: ₹१४,९०,०००
या प्रकरणी मयुर विजय बालमवार (रा. गडचिरोली) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ८३ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमागे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तीक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम यांचे मार्गदर्शन होते.
पोलीस निरीक्षक मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली पोलिस पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास पोउपनि. ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.
👉 विशेष म्हणजे, गडचिरोलीत दारूबंदी असली तरी अशा प्रकारे “छुप्या रस्त्याने” तस्करीचे प्रयत्न अजूनही सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांची वाढती सतर्कता पाहता अशा धंदेवाल्यांसाठी पुढचे दिवस सोपे नसणार, हेही तितकंच खरं. #GadchiroliPolice
