गडचिरोली | प्रतिनिधी दिनांक :08 जुलै 2026
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, मोफत आणि निवासी शिक्षणाची सुवर्णसंधी देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6 वी प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 जुलै 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत आहे. यंदा प्रवेशपूर्व परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 रोजी होणार असल्याची माहिती देत कल्पतरू अकॅडमी, गडचिरोली यांनी पालकांना वेळेत अर्ज भरून घेण्याचे आवाहन केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत चालणारे देशातील प्रतिष्ठित निवासी विद्यालय असून ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके व इतर अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात.
यावर्षी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक मदतीसाठी कल्पतरू अकॅडमी तसेच कोणत्याही नेट कॅफेची मदत घेता येणार आहे.
यासोबतच नवोदय विद्यालय व सैनिक विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेची दर्जेदार तयारी करण्यासाठी कल्पतरू अकॅडमीमध्ये मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग 11 जुलै 2026 तसेच 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य घडविण्यासाठी वेळेत अर्ज भरून प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी सुरू करावी, असे आवाहन कल्पतरू अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क :
कल्पतरू अकॅडमी
युनियन बँकेजवळ, धानोरा रोड, गडचिरोली.
📞 7588773105 / 7588773100
— VIDARBHA NEWS 24 NETWORK
विदर्भाची शान • गडचिरोलीचा मान
