सिरोंचा शैक्षणिक प्रतिनिधी दिनांक:-01 अगस्ट 2026
महाराष्ट्र राज्यातील कृषी शिक्षणाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून, महाराष्ट्र CET Cell मार्फत विविध कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत २ ऑगस्ट २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावी विज्ञान शाखेनंतर केवळ अभियांत्रिकीच नव्हे, तर कृषी क्षेत्रातही उज्ज्वल करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये अपेक्षित शाखा किंवा इच्छित महाविद्यालय मिळत नाही, त्यांच्यासाठी बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर तसेच इतर कृषी अभ्यासक्रम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. याच माध्यमातून पुढे बी.टेक. (अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) आणि बी.टेक. (बायोटेक्नॉलॉजी) यांसारख्या उच्च शिक्षणाच्या संधीदेखील उपलब्ध होतात.
या प्रवेश प्रक्रियेत बी.एफ.एस्सी. (फिशरी सायन्स), बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर, बी.एस्सी. (ऑनर्स) हॉर्टिकल्चर, बी.एस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, बी.एस्सी. (ऑनर्स) फॉरेस्ट्री, बी.टेक. (अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी) आणि बी.टेक. (बायोटेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रात रोजगाराच्या तसेच संशोधनाच्या संधी सातत्याने वाढत असून, आधुनिक शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, जैवतंत्रज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने या अभ्यासक्रमांचा गांभीर्याने विचार करावा.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयांची निवड (काउन्सेलिंग), प्राधान्यक्रम निश्चित करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि ऑनलाइन अर्ज भरणे या बाबींमध्ये योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा विद्यार्थ्यांसाठी कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस मार्फत प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संपर्क: ७५८८७७३१०१
विद्यार्थी व पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
