गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 29 ऑगस्ट 2026
बारावीनंतर नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शासकीय तसेच खासगी महाविद्यालयांमधील बी.एस्सी. नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला २६ ऑगस्ट २०२६ पासून सुरुवात झाली असून, ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२६ असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बी.एस्सी. नर्सिंग हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी निर्धारित ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, MH-NURSING CET मधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.
यंदा नर्सिंग अभ्यासक्रमासाठी उपलब्ध महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे CETमध्ये तुलनेने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती शैक्षणिक मार्गदर्शकांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ गुणांचा विचार न करता उपलब्ध महाविद्यालये, प्रवेशाची पात्रता, शुल्क, शैक्षणिक सुविधा आणि इतर बाबींची योग्य माहिती घेऊन वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
दर्जेदार महाविद्यालयाची निवड महत्त्वाची
बी.एस्सी. नर्सिंगसाठी महाविद्यालयाची निवड करताना केवळ प्रवेश मिळणे एवढेच महत्त्वाचे नसून, नियमित वर्ग, पात्र व पूर्ण शिक्षकवृंद, हॉस्पिटल अटॅचमेंट, हॉस्टेल सुविधा, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शैक्षणिक वातावरण या बाबींचीही तपासणी करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेसकडून विद्यार्थ्यांना गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर परिसरातील बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. टॉपपासून विविध पर्यायांपर्यंत महाविद्यालयांची माहिती, हॉस्टेल व हॉस्पिटल अटॅचमेंट असलेली महाविद्यालये, नियमित वर्ग व शिक्षकवृंदाची माहिती तसेच तुलनेने कमी शुल्कातील पर्याय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच MBBS महाविद्यालयांशी संलग्न बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची माहिती, उपलब्ध शिष्यवृत्ती व फ्रीशिपच्या पर्यायांबाबतही मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या नावाखाली डोनेशन किंवा अनधिकृत अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्यास संबंधित अधिकृत यंत्रणेकडून माहिती व पडताळणी करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
