# गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अहेरीचा राजाचे झाले विसर्जन.* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अहेरीचा राजाचे झाले विसर्जन.*

*माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती !*

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:-07 सप्टेंबर 2025                             अहेरी इस्टेटचे मानाचा गणेश म्हणजे *’अहेरीचा राजा’* दर वर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्सवाने दहा दिवस विविध कार्यक्रमाने मनोभावे रोज महाआरतीत भक्तिभावाने साजरा करण्यात आले.अहेरीचा राजा गणेशाचे आयोजित विसर्जन सोहळ्यात श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोपाचे सुरवात केले.

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव अहेरी राजनगरीत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला.ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अहेरी राजनगरीतील वातावरण भारावून गेले होते.

याप्रसंगी राजे अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले की, अहेरीत दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा झाला. लोकांनी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला. विसर्जनावेळी मनात थोडी खंत आणि दु:ख असते, पण त्याचवेळी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येणार या आनंदाने प्रत्येकाचे मन भरून जाते.

अहेरी शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुक शिस्तीत व शांततेत पार पडला. या यशस्वी व्यवस्थेबद्दल राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी म्हणाले की,पोलीस विभाग, नगरपंचायत आणि स्थानिक प्रशासन यांनी केलेली सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.अहेरीचा राजा विसर्जन सोहळ्याला शहरातील विविध सामाजिक,राजकीय,संघटनांचा तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उपस्थिती होती.
पोलीस आणि राज परिवाराचा एकत्रितपणे केलेल्या व्यवस्थेमुळे हा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडला.

यावेळी राज परिवारातील राणी रुख्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, संतोषजी मेश्राम ( भाऊजी), प्रविणराव बाबा, वैभव श्यामकुंवर यांचीही पूर्ण विसर्जन सोहळ्यात उपस्थिती होती.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!