# सिरोंच्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस! – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

सिरोंच्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या वैद्यकीय, अभियांत्रिकी व शैक्षणिक संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण आज. पाडणार भूमिपूजन...

सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-08/11/2025

गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेल्या आणि सीमाभागातील सिरोंचा तालुक्याचा विकास आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे. आज शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सिरोंचा-अंकीसा मार्गावरील राजेश्वरपल्ली येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते *‘रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड’*च्या महत्त्वाकांक्षी रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि शैक्षणिक कॅम्पस या भव्य प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे.

 हा सोहळा सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरणारा ठरत असून, राणा शिपिंग कंपनीचे संचालक श्री. राणा दिलीप्राव सुर्यवंशी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे केवळ आरोग्य सुविधा नव्हे तर शिक्षण, रोजगार आणि औद्योगिक विकासालाही नवी दिशा मिळणार आहे.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आणि महत्त्व

रुबी हॉस्पिटल आणि वेलनेस प्रा. लि. या कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात खालील घटकांचा समावेश आहे :

  • तीनशे खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

  • मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज

  • एमबीए, बीबीए तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेली महाविद्यालये

हा प्रकल्प साकार झाल्यानंतर सिरोंचा परिसर आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणार असून, विदर्भाच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना व रुग्णांना महानगरांच्या तोडीच्या सुविधा उपलब्ध होतील.

मुख्य अतिथींची उपस्थिती

या भूमिपूजन सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. चे संचालक श्री. राणा दिलीप्राव सुर्यवंशी आणि डॉ. पुरवेज ग्रँट हे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून उपस्थित असतील.

कार्यक्रमाचे ठिकाण — राजेश्वरपल्ली, सिरोंचा-अंकीसा मार्गाजवळ
कार्यक्रमाची वेळ — दुपारी १.१५ वा.

️ सिरोंचा तालुक्याच्या विकासाला नवा आयाम

राणा शिपिंग कंपनीकडून राबविण्यात येणारा हा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील मोठा प्रकल्प सिरोंचा तालुक्याच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सीमाभागातील जनतेसाठी उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून, स्थानिक युवकांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या दारांची उघडझाप या माध्यमातून होणार आहे.

  • स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“हे सिरोंच्याच्या भविष्यासाठी सुवर्णसंधी आहे,” अशी भावना स्थानिक नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आजचा हा ऐतिहासिक क्षण सिरोंच्याच्या विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल असल्याची सर्वांची एकमुखी प्रतिक्रिया आहे.

विदर्भ न्यूज 24, सिरोंचा

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!