# भामरागड परिसरात मोठी कारवाई …नक्षल समर्थक रेकी करताना जेरबंद – 27 ऑगस्टच्या चकमकीत होता सक्रिय सहभागी – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हामहाराष्ट्र

भामरागड परिसरात मोठी कारवाई …नक्षल समर्थक रेकी करताना जेरबंद – 27 ऑगस्टच्या चकमकीत होता सक्रिय सहभागी

"गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात मोठी कारवाई..." "घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणारा नक्षल समर्थक अटकेत..." "पोलीस व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत संशयिताचा पर्दाफाश..." "27 ऑगस्टच्या चकमकीतही घेतला होता सक्रिय सहभाग..." "सदर संशयिताची ओळख सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी म्हणून पटली..." "विशेष आयजी संदीप पाटील व एसपी नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई..." "गडचिरोली पोलिसांनी जानेवारी 2022 पासून 110 माओवादी कार्यकर्त्यांना अटक केली..." "एसपी नीलोत्पल यांचे आवाहन – हिंसक मार्ग सोडा, आत्मसमर्पण करा..."

गडचिरोली, दि. 01 ऑक्टोबर 2025 (विदर्भ न्यूज 24)

       गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. अटक केलेला संशयित इसम 27 ऑगस्ट रोजी झालेल्या भामरागड-कोपर्शी परिसरातील माओवादी चकमकीत सक्रिय सहभागी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

गोपनीय बातमीनुसार, दि. 29 सप्टेंबर रोजी भामरागड पोलिस ठाण्याचे पथक आणि सीआरपीएफ 37 बटालियनचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना, संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने अधिक तपासासाठी त्यास प्राणहिता येथील पोलीस उप-मुख्यालयात आणले. पुढील चौकशीत त्याची ओळख सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (वय 38, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) अशी पटली.

चौकशीत उघड झाले की, मट्टामी हा कट्टर नक्षल समर्थक असून पोलिसांच्या अभिलेखावरील विध्वंसक कारवायांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. विशेष म्हणजे, तो 27 ऑगस्ट 2025 रोजी पोस्टे कोठी हद्दीतील मौजा कोपर्शी-फुलनार जंगलात झालेल्या चकमकीतही सहभागी होता. या अनुषंगाने कोठी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 02/2025 अंतर्गत त्यास 30 सप्टेंबर रोजी औपचारिक अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच इतर गुन्ह्यांमध्येही त्याच्या सहभागाची पडताळणी केली जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ श्री. अजयकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस अधीक्षकांचा संदेश – “हिंसक मार्ग सोडा, आत्मसमर्पण करा”

या कारवाईनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी माओवादी हिंसक कारवायांवर कडक शब्दात इशारा देत सांगितले की, गडचिरोली पोलिसांची माओवादविरोधी मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. तसेच, पुन्हा एकदा माओवादी कार्यकर्त्यांना हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करीत मुख्य प्रवाहात येऊन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले.

जानेवारी 2022 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलिसांना एकूण 110 माओवादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात यश आले असून, या अटकेमुळे नक्षलविरोधी अभियानाला मोठा चालना मिळाली आहे.

–✍️ संपादन : विदर्भ न्यूज 24

#गडचिरोली #भामरागड #माओवादी #नक्षलवादी #नक्षलविरोधीअभियान #गडचिरोलीपोलिस #सीआरपीएफ #नक्षलसमर्थकअटकेत #विदर्भन्यूज24 #Maoist #Gadchiroli #CRPF #PoliceAction #AntiNaxalOperation

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker