# *खरीप 2025 ची ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाकृषी

*खरीप 2025 ची ई-पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक :-06 ऑगस्ट 2025

खरीप हंगाम 2025 साठी पीक पाहणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ही पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे. ई-पीक पाहणी ही प्रक्रिया DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने राबवली जात असून, यावर्षी 01 ऑगस्ट 2025 पासून खरीप हंगामातील पिकांची नोंदणी सुरू झाली आहे.

*डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीतून पाहणीचे सुलभीकरण*
राज्यातील महसूल विभागाने 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला असून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रब्बी 2024 पासून संपूर्ण राज्यात ही प्रक्रिया डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रणालीद्वारे अनिवार्य करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही याचे प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, यासाठी वापरण्यात येणाऱ्या DCS मोबाईल ॲपचे व्हर्जन 4.0.0 अद्ययावत स्वरूपात गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ते त्वरित अपडेट करून वापरात आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

*नोंदणीची वेळापत्रक आणि जबाबदारी*
खरीप 2025 साठी शेतकरी स्तरावरील पीक पाहणी 01 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावरील पाहणी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सहाय्यक कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

*सहाय्यकांची नियुक्ती व अडचणीसाठी मदत*
पीक पाहणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास, गावनिहाय नेमण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सज्ज असतील. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या 7/12 उताऱ्यावर आधारित खरीप हंगामातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे वेळेत पूर्ण करावी, असे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.

*शाश्वत लाभासाठी वेळेत सहभाग आवश्यक*
डिजिटल पीक पाहणी ही शेतकऱ्यांच्या भविष्यातील पीक विमा, नुकसानभरपाई, व शासकीय योजना लाभासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही पाहणी दिलेल्या वेळेत व अचूकरीत्या पूर्ण करणे ही प्रत्येक शेतकऱ्याची प्राथमिकता ठरावी, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आपल्या आवाहनात नमूद केले आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker