हैदराबाद विशेष प्रतिनिधी दिनांक 14 मार्च 2026
तेलंगाना सरकारच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या WE Hub या संस्थेच्या व She Sight Global या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात देशातील सर्वात कमी वयाच्या पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंशी तिवारी (वंशीसूर्य) यांना “फ्लाई हाई वूमेन अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार टॉलीवुड अभिनेत्री Tanvi Akanksha यांच्या हस्ते वंशी तिवारी यांना प्रदान करण्यात आला. यंग प्रोफेशनल या विभागात हा सन्मान देण्यात आला असून वंशी तिवारी यांच्या पत्रकारितेतील कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान वंशी तिवारी यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या समाजापर्यंत पोहोचवणे हेच त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य उद्दिष्ट आहे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी पत्रकारितेची सुरुवात करून गेल्या पाच वर्षांपासून त्या समाजातील प्रेरणादायी कथा, सकारात्मक घडामोडी आणि युवकांना दिशा देणाऱ्या बातम्या सातत्याने मांडत आहेत.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिलांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून Zahid Akhtar Shaikh यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत सांगितले की, महिला उद्योजक आणि प्रतिभावान महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वी हब आणि शी साइट ग्लोबल यांची ही पुढाकार महत्त्वाची असून अशा उपक्रमांमुळे महिलांच्या क्षमतेला नवी दिशा मिळते.
या कार्यक्रमाला Uha Sajja, Sujata आणि Anamika Chakravarti यांचीही उपस्थिती होती.
या सन्मानामुळे वंशी तिवारी यांच्या पत्रकारितेतील कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, युवा पिढीसाठी त्या प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.
