गडचिरोली | प्रतिनिधी दिनांक 17 जून 2026
नुकताच महाराष्ट्र नर्सिंग सीईटी (MH-NURSING CET) चा निकाल जाहीर झाल्यानंतर बी.एस्सी. नर्सिंग व जीएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस यांच्या वतीने 19, 20 आणि 21 जून 2026 रोजी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या चार केंद्रांवर नि:शुल्क समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थी आपल्या पालकांसह कोणत्याही वेळेत उपस्थित राहून प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घेऊ शकतील. नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
समुपदेशनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नर्सिंग सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास पुढील पर्याय कोणते उपलब्ध आहेत, बारावी विज्ञान शाखेतील पीसीबी (PCB) गटातील विषयांमध्ये यश न मिळाल्यास काय करता येईल, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, शासकीय किंवा खासगी महाविद्यालयात प्रवेशाची शक्यता किती आहे, जीएनएम अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो का, खासगी महाविद्यालयांमधील अंदाजे शुल्क किती असू शकते, यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय मागील वर्षांच्या प्रवर्गनिहाय कट-ऑफचा आढावा, चालू वर्षातील संभाव्य कट-ऑफ, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी, तसेच गुणवत्तेनुसार महाविद्यालयांची निवड कशी करावी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नर्सिंग शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांच्या उपस्थितीत होणारे हे नि:शुल्क समुपदेशन विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करणारे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समुपदेशन केंद्रांचे पत्ते
🔹 नागपूर केंद्र: स्टेट बँकच्या वर, नंदनवन, नागपूर
🔹 चंद्रपूर केंद्र: वाघोबा चौक, तुकूम, चंद्रपूर
🔹 गडचिरोली केंद्र: युनियन बँक जवळ, धानोरा रोड, गडचिरोली
🔹 यवतमाळ केंद्र: Aspir Academy, शिवाजी ग्राउंड जवळ, यवतमाळ
अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी 9545544544 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
