अखेर बीएसएनएलची झोप उडाली! ‘विदर्भ न्यूज 24’च्या वृत्ताचा प्रभाव — अवघ्या सहा तासांत नेटवर्क सुरळीत….
तरीही बीएसएनएल चा भोंगळ कारभाराविरुद्ध दाखल घेणे अनिवार्य....

सिरोंचा प्रतिनिधी, विदर्भ न्यूज 24 दिनांक:-30/10/2025
सिरोंचा │ गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेल्या बीएसएनएल नेटवर्कमुळे त्रस्त झालेल्या सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. ‘विदर्भ न्यूज 24’ने “बीएसएनएल सेवा दिवाळीच्या सुट्टीवर” या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा थेट परिणाम होत, अवघ्या सहा तासांत बीएसएनएलची सेवा पूर्ववत झाली!
रेगुंटा, आसरंअल्ली, झिंगानूर आणि सिरोंचा परिसरात सलग चार दिवस नेटवर्क बंद असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा, सरकारी योजना आणि डिजिटल पेमेंट पूर्णपणे ठप्प झाले होते. या स्थितीवर ‘विदर्भ न्यूज 24’ने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बीएसएनएलच्या तांत्रिक विभागाने तत्काळ हालचाल केली. देखभालीची कामे हाती घेऊन काही तासांतच नेटवर्क सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. नागरिकांनी यानिमित्ताने विदर्भ न्यूज 24चे आभार व्यक्त केले आहेत.
स्थानिक रहिवासी म्हणाले —
> “चार दिवस आम्ही त्रस्त होतो, पण ‘विदर्भ न्यूज 24’ने ही समस्या मांडली आणि सहा तासांतच नेटवर्क सुरू झालं. पत्रकारितेची ताकद खरी इथे दिसली!”
सध्या सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे सिग्नल पुन्हा व्यवस्थित सुरू असून, मोबाईल कॉल, नेटबँकिंग व ऑनलाईन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत.
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की जनतेच्या वेदना जर प्रामाणिकपणे माध्यमातून मांडल्या, तर प्रशासन हलते आणि बदल घडतो.
“विदर्भ न्यूज 24”चा आवाज — जनतेच्या हिताचा विजय!
बीएसएनएल सेवा आता पुन्हा सुरळीत, नागरिकांचा दिलासा!
— ✍️ विशेष प्रतिनिधी, विदर्भ न्यूज 24, सिरोंचा



