युनोस्कोच्या निर्णयाचे गोंडवाना विद्यापीठात जल्लोषात स्वागत

गडचिरोली – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-28/07/2025
युनोस्कोने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांचा समावेश जागतिक वारसा म्हणून घोषीत केले आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कीर्तीची नोंद जागतिक यादीत नोंद होणे ही भारतीय व महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वराज्याचे स्वप्न साकार करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी आणि कुशल रणनीतीचा अवलंब केला त्यांनी महाराष्ट्र व शेजारच्या भागांमध्ये डोंगरी किल्ल्यांचे एक विशाल प्रभावी जाळ उभं केलं हे किल्ले केवळ संरक्षणासाठी नव्हते तर प्रशासन लष्करी योजना आणि शत्रूच्या डावपेचा विरुद्ध प्रतिकार यासाठीही केंद्रबिंदू होते.असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे मा.प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंदाचे समन्वयक प्रा. विकास चित्ते यांनी केले. त्यांनी युनोस्कोच्या निर्णयाचे स्वागत करून आपली भूमिका विषद करत सांगितले कि “संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले व जतन केलेले,मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेले १२ किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यातही त्यांचा समावेश‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एका जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.प्रशांत ठाकरे यांनी केले. यावेळी अधिसभा सदस्य श्री.सतीश पडोळे डॉ.बोरा डॉ .शिंदे डॉ.प्रीतेश जाधव डॉ.क्षीरसागर डॉ.शिनखेडे डॉ.बैरागी प्रा. चव्हाण यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पदव्युत्तर विभगातील विद्यार्थी उपस्थित होते.