आष्टी – मुलचेरा मार्गांवर दुचाकीचा अपघात एक जण जागीच ठार दोन जण गंभीर जखमी

आष्टी विशेष प्रतिनिधी दिनांक 25 ऑगस्ट 2025
आष्टी – मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही जवळील पुलाजवळ दुचाकीची किलोमिटर च्या दगडाला जबर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना 25 ऑगस्ट सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
लकी गोरडवार वय 25 वर्ष नांदगाव घोसरी तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.शुभम वाकुडकर वय 24 वर्ष रा. बोंडाळा तालुका नाना वाकुडकर वय 25 वर्ष रा. नांदगाव तालुका पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर अशी जखमी ची नावे आहेत
लखन गोरडवार, शुभम वाकूडकर, नाना वाकुडकर हे तिघे मित्र आपल्या दुचाकीने नांदगाव येथून मुलचेरा येथे काही कार्यक्रमानिमित्ताने दुचाकी क्रमांक MH 34 BW 4909 ने जात असताना आष्टी – मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही पुलाजवळ दुचाकीची किलोमीटर च्या दगडाला जबर धडक बसली यात लकी गोरडवार जागीच मृत्यू झाला. तर शुभम वाकुडकर व नाना वाकुडकर गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमिंना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे