सिरोंच्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अंतर्गत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-23/09/2025
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ तालुक्यातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण रुग्णालयाच्या पटांगणावर हे शिबिर घेण्यात येणार असून यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे.
विशेषज्ञ डॉक्टरांची टीम पुढीलप्रमाणे –
डॉ. पंकज कताररिया – रेसिडेंट सर्जरी
डॉ. विराज वडेरा – मेडिसिन रेसिडेंट
डॉ. निखिल चव्हाण – बालरोग तज्ज्ञ
डॉ. राहुल महल्ले – स्त्रीरोग तज्ज्ञ
डॉ. आशुतोष जावळेकर – दंत तज्ज्ञ
डॉ. मेहराम – नेत्ररोग तज्ज्ञ
श्री. संदीप मोगरे – ऑडिओमेट्रिस्ट
शिबिरात महिलांच्या आरोग्य तपासण्या, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, शुगर, रक्तदाब, अशक्तपणा तसेच बालकांच्या आरोग्य व पोषण तपासण्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उपचार, औषधोपचार व आवश्यक मार्गदर्शनही मोफत दिले जाणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके यांनी आवाहन केले आहे की, “या विशेष शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. हे अभियान महिलांच्या आरोग्य तपासणीसह संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.”