# एलएमईएलने जोडला महिला सक्षमीकरण आणि कार्यबलातील लैंगिक समानतेचा नवीन अध्याय* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

एलएमईएलने जोडला महिला सक्षमीकरण आणि कार्यबलातील लैंगिक समानतेचा नवीन अध्याय*

हलकी मोटार वाहने चालविण्याचे एलएमईएल-प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या कोनसरी गावातील १९ महिला कंपनीच्या कुशल कार्यबळात झाल्या सामील

कोनसरी (गडचिरोली)विशेष प्रतिनिधी दिनांक:-12/09/2025

कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेचा एक नवीन अध्याय लिहिताना, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या कुशल

कार्यबलात सामील केले आहे. हलके मोटार वाहन चालविण्याचे एलएमईएल-प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता ह्या महिलांना कंपनीत नोकरी मिळाली आहे.
ह्याच वर्षी जूनमध्ये, एलएमईएलने कोनसरी गावातील १९ महिलांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात हलके मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. ४५ दिवसांच्या निवासी कार्यक्रमादरम्यान, या महिलांना हलके मोटार वाहन चालविण्याचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे त्यांचा आत्मविश्वासच नाही तर प्रतिष्ठेची भावनाही अधिक वृद्धिंगत झाली. या महिलांनी नवीन कौशल्य आत्मसात केल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटला.
कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेल्या ह्या समारंभात या महिलांना संबोधित करताना

एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की,लॉईड्स मेटल्सने समुदाय सक्षमीकरणाला यशाचा आधारस्तंभ मानले आहे. एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या उदात्त दृष्टिकोनात कौशल्य विकासाद्वारे स्थानिक समुदायातील महिलांचे सक्षमीकरण, कार्यबलात लैंगिक समानता सुनिश्चित करणे, आणि महिलांना उत्तरोत्तर प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे समाविष्ट आहेत, असे त्यांनी सांगितले. या महिला एलएमईएल परिवारात सामील झाल्यामुळे, त्यांच्या जीवनात प्रगतीचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारीद्वारे उच्च भूमिकांसाठी पात्रता मिळवून प्रगतीची शिडी चढण्याचा सल्ला एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याप्रसंगी नवनियुक्तांना दिला.

या प्रसंगी एलएमईएल परिवारात नवीन सामील झालेल्या ह्या महिलांना नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वाहनचालन परवाना, आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker