स्वामी विवेकानंद युवा लोककल्याण संघ तर्फे ‘बेस्ट मिलिंग कॅम्प’चे आयोजन — महिलांमध्ये आरोग्यजागरूकतेचा संदेश…

नागपूर (प्रतिनिधी) दिनांक:-03/11/202
शिवननगर स्लम परिसरातील श्री शितला माता मंदिर येथे स्वामी विवेकानंद सेवा संस्थ तर्फे एक दिवसीय “ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग कॅम्प” (स्त्रियांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर) मोठ्या उत्साहात पार पडले.
या शिबिरात गोपाल कृष्ण नगर परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवत स्तनाच्या कॅन्सरविषयी जागरूकता, आरोग्य तपासणी तसेच नियमित जीवनशैलीबाबत मार्गदर्शन घेतले. संस्थेचे अध्यक्ष जयपाल ताकोते व महिला डॉ च्या चमु ने तपासणी केली
गोपालकृष्ण नगर शाखा चे स्वयसेवक सौरभ बुरख्कर,महेन्द्र tripathi गुरुदास पर्वत, अमोल निभावत,बंटी kukde, राजेन्द्र चकोले, नलिनी महाजन आदी चे सहकार्य
या शिबिराचे विशेष सहकार्य WCL (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) व स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी केले.
आरोग्य तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकारी व स्वयंसेवकांनी ,महिलांची तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. कॅन्सरविषयी जनजागृतीसाठी विशेष प्रेझेंटेशन व माहितीपर पुस्तिका वाटप करण्यात आले.
संस्थेच्या सदस्यांमध्ये रोहित Lanjewar, निलेश mate मंजूशी चन्नै, खुशी नेवारको, dr विशाखा Nilawar लावार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरात आलेल्या नागरिकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून संस्थेचे अध्यक्ष Jaypal Takote यांनी सांगितले की,
> “महिलांचे आरोग्य हे समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. जागरूकता वाढवून प्रतिबंधात्मक उपाय हेच खरे औषध आहे.”
या शिबिरातून नागरिकांमध्ये आरोग्यजागरूकतेचा संदेश पोहोचवण्यात ‘स्वामी विवेकानंद सेवा संस्था यशस्वी ठरला आहे.



