सिरोंचा विदर्भ न्यूज 24 दिनांक:- 27 एप्रिल 2026
सिरोंचा येथे आज गो सन्मान रॅली मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. अय्यप्पा मंदिर येथून सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही रॅली बस स्टँड चौक, मुख्य बाजार मार्गाने मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर पोहोचली. “जय नंदी बाबा”, “जय गोमाता” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीत बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांसह अनेक गोभक्त, संत समाजातील प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष आकर्षण ठरलेली बैलबंडी रॅलीत सहभागी करण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
रॅलीनंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना सविस्तर प्रार्थना पत्र सादर करण्यात आले. या निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद 48 व 51A(g) यांच्या भावनेनुसार गोवंशाला “राष्ट्रमाता – राष्ट्र आराध्या” असा संवैधानिक दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशभर गोहत्या बंदीसाठी एकसमान कडक केंद्रीय कायदा लागू करण्याची व “केंद्रीय गोसेवा मंत्रालय” स्थापन करण्याचीही मागणी यामध्ये नमूद करण्यात आली.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, देशी गोवंश हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था व सांस्कृतिक परंपरेचा कणा असून सध्या त्यांची संख्या घटत चालली आहे. भूक, अपघात, तस्करी व अवैध कत्तलीमुळे गोवंशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे संविधानातील मार्गदर्शक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी करून गोवंश संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर ठोस धोरण राबवणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले.
“एक देश – एक कायदा” या संकल्पनेतून देशभरातील 5500 हून अधिक तहसील कार्यालयांमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी निवेदन देण्याचा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महत्वाचे म्हणजे संपूर्ण रॅली शांततेच्या मार्गाने पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची आयोजकांनी विशेष काळजी घेतली होती.
या रॅलीमुळे शहरात सामाजिक व सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देण्यात आला असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.