सिरोंचा (विदर्भ न्यूज 24 ब्यूरो) दिनांक 28 एप्रिल 2026
सिरोंचा नगरपंचायतीत आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव स्पष्ट बहुमताने मंजूर झाला असून, सत्ताधारी गटाची सत्ता कोसळली आहे. एकूण 14 नगरसेवकांनी एकत्र येत ठाम भूमिका घेतल्यामुळे नगरपंचायतीत सत्तांतर निश्चित झाले आहे.
काही दिवसांपूर्वी नगरसेवकांच्या गटाने जिल्हा प्रशासनाकडे ठराव सादर केला होता. त्यानंतर नियमानुसार विशेष बैठक बोलावण्यात आली. ही बैठक उपविभागीय अधिकारी (SDM) राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली आणि निकाल जाहीर होताच सत्ताधाऱ्यांचा पराभव स्पष्ट झाला.
या संपूर्ण प्रक्रियेत तहसीलदार तथा मुख्याधिकारी अजय सकुंदरवार यांचा सह नगर पंचायतचे कर्मचारी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशासनाच्या देखरेखीखाली संपूर्ण कार्यवाही पार पडली.
या निर्णयानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे रिक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील टप्प्यात नव्या निवडीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, लवकरच पुन्हा एक विशेष बैठक बोलावून नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणेकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
या घडामोडीनंतर नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आता कोणत्या गटाकडे सत्ता जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी निवड प्रक्रियेत कोण बाजी मारतो, हेच पुढील राजकीय चित्र ठरवणार आहे.
👉 आता नजर पुढील सभेकडे — सिरोंचा नगरपंचायतीला मिळणार नवे नेतृत्व!
#सिरोंचा #नगरपंचायत #अविश्वासप्रस्ताव #सत्तांतर #BreakingNews #VidarbhaNews24 #Gadchiroli #Politic
