गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 20 जून 2026 :
नुकताच जाहीर झालेल्या MHT-CET (PCM/PCB) परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये उच्च शिक्षण प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविताना कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, किती शुल्क लागेल, तसेच CAP, ACAP, IQ आणि NRI कोट्यांबाबतची माहिती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर यांच्या वतीने विशेष नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे मार्गदर्शन शिबिर 21 जून ते 23 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थी व पालकांना सुमारे 15 मिनिटांचे वैयक्तिक समुपदेशन देण्यात येणार असून त्यांच्या गुणांनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या MHT-CET स्कोअरनुसार कोणत्या शाखेत प्रवेश मिळू शकतो, सरकारी, खासगी किंवा डीम्ड विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या संधी काय आहेत, महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यांतील महाविद्यालयांचे पर्याय कोणते आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तसेच, शिष्यवृत्तीच्या संधी, पूर्ण फी अथवा कमी शुल्कात प्रवेश मिळण्याच्या शक्यता, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, मागील वर्षांचे कट-ऑफ कसे तपासावेत, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पर्याय कोणते आहेत आणि ACAP प्रक्रियेमधून प्रवेश मिळण्याच्या संधी याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसन करून त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मार्गदर्शन शिबिराची केंद्रे
नागपूर : कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नंदनवन, नागपूर
मो. 9545544544
गडचिरोली : कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँक जवळ, धानोरा रोड, गडचिरोली
मो. 9422867169
चंद्रपूर : कल्पतरू अभ्यासिका, वाघोबा चौक, तुकूम, चंद्रपूर
मो. 8830989046
यवतमाळ : Aspir अकॅडेमी, शिवाजी ग्राउंड समोर, यवतमाळ
मो. 9545444554
विद्यार्थी आणि पालकांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन कृणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags : #MHCET2026 #EngineeringAdmission #PharmacyAdmission #AgricultureAdmission #CAPRound #ACAPAdmission #KalpataruEducationalServices #Nagpur #Gadchiroli #Chandrapur #Yavatmal #CareerGuidance #VidarbhaNews24 #AdmissionCounselling #MHTCETResults2026
