गडचिरोली प्रतिनिधी दिनांक 06 जुलै 2026
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. विद्यार्थ्यांना ही परीक्षा केवळ एकदाच देण्याची संधी मिळत असल्याने पालकांनी या परीक्षेकडे गांभीर्याने पाहून मुलांना योग्य मार्गदर्शन व तयारी करून द्यावी, असे आवाहन कल्पतरू अकॅडमी, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अकॅडमीच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये इयत्ता तिसरीपासूनच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रम केवळ शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरतो.
या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी व्याकरण, गणित आणि तर्कशक्ती विकसित करणाऱ्या विविध घटकांचा समावेश असून त्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, विश्लेषण क्षमता, तार्किक विचार, अनुमान काढण्याची क्षमता आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित होते. तसेच गणिताचा पाया मजबूत होऊन भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो.
अकॅडमीने पालकांना आवाहन करताना सांगितले की, इयत्ता बारावीपर्यंत अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी शालेय शिकवणी लावतात; मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच मिळणाऱ्या चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी विशेष लक्ष देणे अधिक आवश्यक आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम भविष्यातील पोलीस भरती, तलाठी, लिपिक तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो.
कल्पतरू अकॅडमी, गडचिरोली येथे १० जुलै २०२७ पासून स्कॉलरशिप मार्गदर्शन वर्ग सुरू होणार असून इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकॅडमीचे संचालक यांनी केले आहे.
प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क : ७५८८७७३१०५
—(टीप : ही बातमी संबंधित संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तयार करण्यात आली असून हा जनहितार्थ प्रसिद्धीपर लेख आहे.)
