गडचिरोली प्रतिनिधी दिनांक :-18जुलै 2026
Re-NEET 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील हजारो विद्यार्थी व पालकांमध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या गुणांवर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो, कोणते कॉलेज मिळण्याची शक्यता आहे, कोणत्या कोट्यातून प्रवेश घेता येईल, तसेच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, अशा विविध शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस यांच्या वतीने 19 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत नागपूर व गडचिरोली येथे पूर्णपणे नि:शुल्क मेडिकल प्रवेश मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरामध्ये प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वैयक्तिकरित्या सुमारे 10 मिनिटांचे मार्गदर्शन दिले जाणार असून, दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना NEET स्कोअरनुसार MBBS, BDS, BAMS, BHMS, BVSc, BPTH यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची शक्यता, Government, Semi-Government, Private किंवा Deemed Medical College यांपैकी कोणत्या प्रकारच्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय CAP, ACAP, Institutional Quota (IQ), NRI Quota, State Quota व All India Quota, Other State प्रवेश प्रक्रिया, All India Rank (AIR) व State Merit List (SML) यांचा प्रवेश प्रक्रियेवर होणारा परिणाम, तसेच स्कॉलरशिप, फ्रीशिप व शुल्क रचना याबाबतही सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, NEET परीक्षेत कमी गुण मिळालेल्या किंवा केवळ पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेले विविध प्रवेश पर्याय, तसेच मेडिकल व्यतिरिक्त इतर पर्यायी आरोग्यविषयक अभ्यासक्रमांची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, कॉलेज निवड, काउन्सेलिंग प्रक्रिया आणि पुढील टप्प्यांबाबतही तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.
आयोजकांनी विद्यार्थी आणि पालकांना कोणताही संभ्रम न ठेवता या मोफत मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
मार्गदर्शन केंद्रे
📍 नागपूर
कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नंदनवन, नागपूर
संपर्क : 9545544544
📍 गडचिरोली
कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँकेजवळ, धानोरा रोड, गडचिरोली
संपर्क : 9422867169
अधिक माहितीसाठी : 7588773101
विद्यार्थी व पालकांसाठी आवाहन
Re-NEET 2026 नंतर योग्य निर्णय घेणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम न ठेवता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य अभ्यासक्रम आणि योग्य महाविद्यालयाची निवड करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
