गडचिरोली विदर्भ न्यूज 24 प्रतिनिधी दिनांक 26 मार्च 2026
गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी व लेखी चाचणीनंतर आता उमेदवारांच्या प्राप्त गुणांची तात्पुरती यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा दिनांक 18 मार्च 2026 रोजी पार पडली होती, तर पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे ही प्राथमिक (तात्पुरती) यादी तयार करण्यात आली आहे.
सदर यादी गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांनी आपल्या गुणांची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, या यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यासाठी मर्यादित वेळ देण्यात आला आहे. यादी प्रसिद्ध झाल्याच्या वेळेपासून केवळ 24 तासांच्या आतच आक्षेप नोंदविण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीनंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप विचारात घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणूनच, उमेदवारांनी वेळ न दवडता आपल्या गुणांची पडताळणी करून आवश्यक असल्यास तात्काळ आक्षेप नोंदवावेत, अन्यथा नंतर कोणतीही संधी मिळणार नाही.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही यादी तात्पुरत्या स्वरूपात जाहीर करण्यात आली असून, आक्षेपांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे.
👉 उमेदवारांसाठी सल्ला:
ही संधी “last chance” समजा—गुण तपासा, काही चूक दिसली तर लगेच action घ्या, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल!
आपल्या रिझल्ट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.gadchirolipolice.gov.in
— विदर्भ न्यूज 24
