मुंबई विदर्भ न्यूज 24 विशेष प्रतिनिधी 26 मार्च 2026
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत मुख्यमंत्री #Devendra Fadnavis यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, धान पिकाला बोनस (प्रोत्साहनपर रक्कम) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. या निर्णयासाठी आवश्यक निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. #Sudhir Mungantiwar यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करून धान उत्पादक शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती अत्यंत ठामपणे मांडली होती. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्तींचा फटका आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार देणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.
या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात उत्तर देताना मुख्यमंत्री #Devendra Fadnavis यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत, धानाला बोनस देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आ. #Sudhir Mungantiwar यांनी सातत्याने विधानसभेत मांडल्या. त्यांनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर करत, शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर चित्र मांडले होते. त्यांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाला या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे लागले.
याच प्रयत्नांचे फलित म्हणून धानाला बोनस देण्याबाबत सकारात्मक भूमिका जाहीर झाली असून, हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. सध्याच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय ‘ऑक्सिजन’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, आ. #Sudhir Mungantiwar यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश मिळत असून, मुख्यमंत्री #Devendra Fadnavis यांच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शासनाच्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
#धानबोनस #विदर्भशेतकरी #महाराष्ट्रराजकारण #DevendraFadnavis #SudhirMungantiwar #VidarbhaNews24
