गडचिरोली प्रतिनिधी विदर्भ न्यूज 24 दिनांक:-26 जुन 2026
NEET 2026 परीक्षेनंतर विविध कोचिंग संस्थांच्या Answer Key च्या आधारे विद्यार्थ्यांनी आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज घेतला असून, त्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाबाबत अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण झाले आहेत. याच शंकांचे निरसन करून योग्य अभ्यासक्रम, योग्य महाविद्यालय आणि प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक माहिती देण्यासाठी Kalptaru Educational Services तर्फे 26 जून ते 28 जून 2026 या कालावधीत पूर्णपणे नि:शुल्क वैयक्तिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BVSc आणि BPTH अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांना प्रत्येकी 15 मिनिटांचे वैयक्तिक समुपदेशन केले जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत तज्ज्ञांकडून प्रवेशासंदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या NEET स्कोअरनुसार कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो, कमी गुण मिळाल्यास उपलब्ध असलेले पर्याय, Government, Semi-Government, Private किंवा Deemed Medical College मध्ये प्रवेशाची शक्यता, तसेच State Quota, All India Quota, Other State Quota, CAP, ACAP, Institutional Quota (IQ) आणि NRI Quota याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय All India Rank (AIR) व State Merit List (SML) च्या आधारे प्रवेशाची शक्यता कशी तपासावी, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, शिष्यवृत्ती व फी सवलतीचे पर्याय, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, तसेच मेडिकल व्यतिरिक्त उपलब्ध असलेल्या इतर पर्यायी अभ्यासक्रमांविषयीही सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, NEET परीक्षेत केवळ पात्र (Qualified) ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध प्रवेशाच्या संधींबाबत माहिती देऊन त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
मार्गदर्शन केंद्रे
📍 नागपूर :
कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नंदनवन
मो. 9545544544
📍 गडचिरोली :
कल्पतरू अकॅडेमी, युनियन बँकजवळ, धानोरा रोड
मो. 9422867169
📍 चंद्रपूर :
कल्पतरू अभ्यासिका, वाघोबा चौक, तुकूम
मो. 8830989046
📍 यवतमाळ :
Aspir Academy, शिवाजी ग्राउंडसमोर
मो. 9545444554
अधिक माहितीसाठी Kalptaru Educational Services च्या 7588773101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विद्यार्थी व पालकांनी मेडिकल प्रवेश प्रक्रियेतील संभ्रम दूर करून योग्य निर्णय घेण्यासाठी या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
