अंधाऱ्या जंगलात नक्षल्यांशी झुंज देणाऱ्या शूर PSI वासुदेव मडावी यांचा आझाद गणेश मंडळ, अहेरी तर्फे सत्कार”
"C-60 चे पराक्रमी योद्धा PSI वासुदेव मडावी यांचा अहेरीत शौर्यगौरव सोहळा" 2. " 3. "शंभरी पार केलेल्या चकमकी –6 वर्षांच्या सेवेबद्दल वासुदेव मडावींचा भव्य गौरव"

अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक 07 सप्टेंबर 2025
गडचिरोलीच्या दहशतीच्या जंगलात 26 वर्षे अखंड झुंज देणारे व अनेक शौर्यगाथा लिहिणारे C-60 चे पराक्रमी पोलिस उपनिरीक्षक मा. वासुदेव मडावी साहेब यांचा भव्य गौरव सोहळा आज आझाद गणेश मंडळ, अहेरी यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. अजय कोकाटे साहेब, उप विभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता, सौ. कोकाटे मॅडम, मा. हर्षल ऐकरे साहेब, पोलिस निरीक्षक अहेरी, तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी प्रमोद दोन्तुलवार व कन्हैय्यालाल कोंडुमल रोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
—शौर्याला सलाम
घनदाट जंगलातील पायवाटा, नक्षलवाद्यांची दहशत आणि गोळ्यांच्या लढाईत तब्बल 100 पेक्षा अधिक चकमकींमध्ये विजय मिळवणारे वासुदेव मडावी हे C-60 दलातील शौर्याचे प्रतीक मानले जातात.त्यांच्या या पराक्रमाचा गौरव करत मंडळाच्या वतीने त्यांना शाल–श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीनिवास वीरगोनवार, सचिव संदीप गुमूलवार व उपाध्यक्ष तुषार पारेल्लीवार होते.
मंडळाचे सदस्य – देविदास येनमवार, प्रसाद मद्दीवार, अनुराग बेझलवार, गौरव तेलंग, विजय रंगुलवार, मयूर चांदेकर, सुमित मोतकुरवार, रक्षित नरहरशेट्टीवार, सूचित कोडेलवार यांच्यासह अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले.प्रास्ताविक : संतोष मुद्दीवार,संचालन : अक्षय येन्नमवार,आभार प्रदर्शन : अक्षय मंथनवार,मनोगत : निखिल गड्डेवार
या गौरव सोहळ्यास नागरिक, व्यापारी व गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आझाद गणेश मंडळ, अहेरी तर्फे सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
jk3idj